
गेवराई/प्रतिनिधी
भारताला ऑलिम्पिक मध्ये सलग सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हॉकी संघाचा कर्णधार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या संचालक व सदस्यांनी क्रीडांगणावर जाऊन राष्ट्रीय व राज्य खेळाडूंचा गौरव केला. यावेळी शेकडो विद्यार्थी खेळाडू मैदानावर उपस्थित होते.दि.२९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनी संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यानिमित्त गेवराई रोटरी क्लबच्या संचालक व सदस्यांनी पाऊस सुरू असताना ही जगदंबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात शारदा स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मैदानावर सायंकाळी जाऊन कबड्डी,खो-खो,सॉफ्ट बॉल,ॲथॅलॅटिक्स व इतर खेळातील राष्ट्रीय व राज्य खेळाडूंचा सन्मान करण्यात आला सुरुवातीला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कबड्डी चे एनएसआय कोच डॉ.केतन गायकवाड, शुभम कादे,राष्ट्रीय व राज्य खेळाडू बाळु आडे,गणेश यादव, ज्ञानेश्वर धापसे,भरत यादव,सॉफ्टबॉल चा गौतम बोरूडे,खो-खो चे तेजस्विनी जंगले, प्रतीक्षा येवले,ज्ञानेश्वरी काळम,ऋतुजावाघमारे, अभिजीत हिवाळे, वेदांत काळे,सुशांत नलवडे,करण मोमीन, ऋतिक करे, निशांत तळवडे,विजय धुरंधरे आदी खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला याच कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू व कोच डॉ. केतन गायकवाड, विजय जाहेर खो -खो, प्रा.डॉ.रविंद्र खरात ॲथलेटिक्स,सचिन मोहिते योगासन,विजय अपसिंगेकर -व्हॉलीबॉल,मयूर मोटे- कबड्डी, प्रल्हाद जाधव आदी खेळाडूंचा सन्मान रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र बरकसे,सचिव प्रविण जैन,व्होकेशनल सर्व्हिस चेअरमन राजेंद्र डेंगे,क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन गणेश कुलकर्णी,रामदास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळीखेळाडूंना मार्गदर्शन करताना प्रा. राजेंद्र बरकसे यांनी खेळात करियरच्या संधी खूप आहेत.देश – विदेशात जाता येते, सांघिकता व एकतेची भावना वृद्धिंगत होते .
यश – अपयश पचवायची ताकत निर्माण होते.बुद्धिमत्ता वाढीस लागते त्यामुळे किमान सायंकाळी तरी पालकांनी मुलांना ग्राऊंडवर पाठवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.खेळाडूंशी संवाद साधताना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील थरारक व रोमांचकारी अनुभव सांगून खेळामुळे राष्ट्र बळकट होते,असे मत क्लब प्रशासक गणेश कुलकर्णी यांनी मांडले . रोटरी क्लब ऑफ गेवराईचे सचिव प्रविण जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले.



