कृषीसामाजिक

शेतकरी-कामगारांच्या हक्कांसाठी राज्यव्यापी दिशा ठरवणारी बैठक, शेतकरी जनहित कामगार मंचची ७ जानेवारीला बीड येथे भव्यराज्यस्तरीय बैठक

बीड/प्रतिनिधी

शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या शेतकरी जनहित कामगार मंच,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या बुधवार दि.७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२-३० वाजता बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे भव्य राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी,कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून शेतकरी-कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा होणार आहे.

या राज्यस्तरीय बैठकीस महाराष्ट्र अध्यक्ष जयवंतराव कांबळे, महाराष्ट्र सचिव दीपक गायकवाड,ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पगारे तसेच मुंबई उपाध्यक्ष नयन कदम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बैठकीचे अध्यक्षस्थान बीड जिल्हा समन्वयक पांडुरंग कसबे भूषविणार असून स्वागताध्यक्ष म्हणून बीड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांची प्रमुख भूमिका असणार आहे.या बैठकीस प्रदेशाध्यक्ष श्रीमतीसोळंके यांच्यासह नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष कटाळे, लातूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप वाघचौरे,पुणेजिल्हा अध्यक्ष अमर कांबळे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष पियुष सावंत,सातारा जिल्हाध्यक्ष सागर घाडगे, जालना जिल्हा अध्यक्ष आशिष गवळी यांच्यासह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष,उपाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

बीड जिल्हा उपाध्यक्ष अतिक सय्यद यांचीही या बैठकीत महत्त्वपूर्ण उपस्थिती राहणार आहे.राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण,शेतमाला ला मिळणारा कमी दर, अपूर्ण रस्ते व विकास कामे,कामगारांचे प्रश्न, बेरोजगारी, सामाजिक न्याय तसेच संघटनेची पुढील दिशा व आंदोलनात्मक भूमिका यावर या बैठकीत सखोल चर्चा करून ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.

राज्यातील शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात येणार आहे.या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन राहुल दळवी,राहुल रोकडे, शिवाजी राठोड,इंद्रजीत डोंगरे,बाबुराव डोंगरे, प्रतीक वाघमारे,अरबाज शेख,तुकाराम गालफाडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

शेतकरी व कामगार हिताच्या लढ्याला नवी दिशा देणाऱ्या या ऐतिहासिक राज्यस्तरीय बैठकीस राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी जनहित कामगार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!